Cancel Preloader

कशी होते कमाई YouTube वरून ? 1000 व्ह्यूज आल्यावर एवढे रुपये मिळतात

 कशी होते कमाई YouTube वरून ? 1000 व्ह्यूज आल्यावर एवढे रुपये मिळतात

सध्याच्या तरुणाई मध्ये रिल्स बनवायचा व ते सोशल मीडियावर शेअर करण्याची प्रचंड क्रेझ निर्माण झालेली दिसते. यातून चांगली कमाई देखील होते. विशेष म्हणजे काही व्यक्ती युजर्स नोकरी न करता आता सोशल मीडियाच्या माध्यमातून बक्कळ असा पैसे कमावणं हा काही नवतरुणांचा पेशाच बनलाय. खरंतर अनेक तरुण लाखो रुपये या माध्यमातून कमावतात.

असाच एक प्रकार घडला आहे उत्तर प्रदेशमध्ये एका YouTuber च्या घरावर इन्कम टॅक्स उप विभागाने (Income Tax Dept) छापा टाकला. या छाप्यात त्या युट्यूबरकडून तब्बल 24 लाख रुपयांची रोख रक्कमसह जप्त करण्यात आली आहे. तस्लीम बी खान (Taslim Khan.) असं या युट्यूबरचं नाव असून एडिटिंग व अवैध पद्धतीने त्याने करोडो रुपये कमावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. तस्लीम खान आपल्या भावाबरोबर मिळून Trading Hub 3.0 नामक हे युट्यूब चॅनेल चालवतो. या चॅनेलवर तो शेअर मार्केट शी (Share Market) संबंधीत व्हिडिओ देखील टाकतो. यातून तो YouTube कडून लाखो रुपये कमा वतो. पण प्रश्न असा आहे की YouTube मधून खरोखरच इतकी कमाई होते का? तस्लीमचा भाऊ फिरोजने YouTubeच्या माध्यमातून चांगली कमाई होत असल्याचं म्हटलं आहे. आतापर्यंत त्यांनी आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून 1.21 कोटी रुपयांची कमाई केली व त्यांनी आतापर्यंत 40 लाखहून अधिक रुपये इन्कम टॅक्स भरल्याचा दावाही त्यांनी केलाय. 

YouTube वरुन अशी होते कमाई?

सध्या कॉलेजियन्स व अन्य तरुणाई ला रिल्स बनवण्याची क्रेझ आहे. वेगवेगळ्या विषयांवर कॉमेडी, मोटिवेशनल, धार्मिक व अन्य रिल्स बनवल्या जातात. त्यांच्या कंटेटवर येणाऱ्या जाहीरातीवरून म्हणजेच कंटेंट monitization वर त्यांना पैसे मिळतात. हे पैसे वेगवेगळ्या कंटेंटनुसार जसे की रिल्स, इमेज, व्हिडिओ, टाईम मध्ये कमी-जास्त असतात. वास्तविक YouTube वरुन मिळणारे पैसे हे कंटेंट, रीजन आणि इतर गोष्टींवर अवलंबून असतात. कंटेंट क्रिएटर्सची 55 टक्के कमाई जाहीरातीतून होते. 

पण ही अट मान्य करावीच लागते बर का !
युजर्सला YouTube- Partner- Program चा भाग असावा लागतं. तसंच चॅनल क्वालीफाय होण्यासाठी चॅनेलवर 500 सबस्क्राईबर्स आणि 3000 तासांचा वॉचटाईम असावा लागतो. आता या काही महिन्या अगोदरच कमी सबस्क्राईब मध्ये लागू नवीन सूचना केली आहे त्यातच YouTube Shorts च्या माध्यमातून देखील क्रिएटर्स कमाई करु शकतात. 

2022 डेटा नुसार अमेरिकेतील युट्यूबर्स जवळपास 4620 डॉलर्स म्हणजेच 3,77,254 रुपये महिन्याला कमवतात. युट्यूब क्रिएटर्सला 1000 व्ह्यूजवर 18 डॉलर म्हणजे 1558 रुपयांची कमाई होते. कंटेंट क्रिएटर्सची अधिक कमाई त्याचा कंटेंट किती स्ट्राँग व युनिक आहे, प्रेक्षक, व्ह्यूज आणि सबस्क्राईबर्सच्या quality कंटेंट माध्यमावर ठरतो. 

याशिवाय YouTube Shorts, मेंबरशिप आणि इतर शॉप/गिफ्ट पद्धतीनेही पैसे कमावता येतात. तुमचा युनिक कंटेंट चांगला आणि आवडणारा असेल तर तुम्ही दर महिन्याला पाच आकड्यांचीही कमाई यावर करु शकता. कंपनी क्रिएटर्सला म्हणजेच त्याच्या YouTube चॅनेल आणि कंटेंटवर येणाऱ्या कंटेंट इंगेजमेंट तसंच व्ह्यूजच्या Watch time माध्यमातून पैसे मिळतात. ही रक्कम 100 डॉलर ते 10 हजार डॉलर्सपर्यंत कशीही असू शकते. अनेक YouTube channel व्हिडिओतील जाहिरातींच्या माध्यमातून कंपनीची कमाई होतेच मात्र आणि यातील काही हिस्सा देखील यात क्रिएटर्सला दिला जातो.

 

Related post

error: Content is protected !!