Cancel Preloader

अचानक मोबाईलवर ‘टेस्ट अलर्ट’ आला आणि असं काही घडलं….!

 अचानक मोबाईलवर ‘टेस्ट अलर्ट’ आला आणि असं काही घडलं….!

मोबाईल स्क्रीनवर व्हॉईस मेसेजसह ‘भारत सरकारच्या दूरसंचार विभागा’कडून चाचणी अलर्ट आला.  

काहीजण घाबरले, काही हताश झाले, तर काहींना वाटलं आपला मोबाइल हॅक झाला कारण…. एका वेळेस सगळे फोन रिंग व्हाईब्रेट वर आणि कोणाला वाटणार नाही की काही तरी गडबड आहे अस… पण प्रत्यक्षात झालं अस की,   

गव्हरमेंट टेलिकॉम सेक्टर ने म्हणजेच DoT ने सर्व सिम कार्ड ऑपरेटर कंपन्यांना आपत्ती व्यवस्थापन उपक्रमासाठी त्यांच्या चाचणी तयारीचा एक भाग म्हणून ओडिशा आणि महाराष्ट्रातील सिम कार्ड कंपन्यांच्या ग्राहकांना चाचणी सेल ब्रॉडकास्ट संदेश पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ही झालेली चाचणी

तुम्हाला आम्हाला आलेला संदेश खालील प्रमाणे असेल, खाली स्क्रीनशॉट पहा.

आम्हाला ओडिशा आणि महाराष्ट्रातील ग्राहकांकडून या संदेशांवर स्पष्टीकरणासाठी काही कॉल प्राप्त होऊ शकतात, ज्यामध्ये आम्ही त्यांना सांगू शकतो की हे ‘DoT, सरकारचे चाचणी संदेश आहेत. असे गव्हरमेंट टेलिकॉम ने संगितले आहे, आणि ते याकडे दुर्लक्ष देखीलकरू शकतात.

हे इमर्जन्सी अलर्ट सिस्टीम आहे. आपत्ती आलेल्या भागात अश्याप्रकारे DOT कडुन मोबाईलवर अलर्ट दिले जाते कि आपत्तीजनक परिस्थिती आहे जेणेकरून सावधानता बाळगावी. एप्रिल महिन्यात टेलिकॉम रुल्स मधे सुधार करून हे फिचर सर्व मोबाईल कंपन्यांना अनिवार्य करण्यात आलेले आहे.

 कृपया या संदेशांच्या प्राप्तीबद्दलच्या शंका/तक्रारी हाताळण्यासाठी वेबसाईट द्वारे आपण ‘DoT’ ला कळवू शकतात असे संगितले देखील आहे.  जर तुम्हाला आणीबाणीच्या सूचना प्राप्त करायच्या नसतील तर वैकल्पिकरित्या तुम्ही तुमच्या हँडसेट सेटिंग्जमधून अशा सूचना थांबवू शकता.

Related post

error: Content is protected !!