Cancel Preloader

Network Issue : मोबाईल नेटवर्क मिळतच नाही? ह्या घ्या सोप्या ट्रिक्स… कुठल्याही खोलीत येईल रेंज!

 Network Issue : मोबाईल नेटवर्क मिळतच नाही? ह्या घ्या सोप्या ट्रिक्स… कुठल्याही खोलीत येईल रेंज!

आजकाल स्मार्टफोन हा आपल्या शरीराचाच (Body) एक भाग असल्यासारखं आहे. घरात व कुठेही बसून असलं तरीही लोक मनोरंजनासाठी मोबाईलवर काहीतरी बघत बसतात. वर्क फ्रॉम होममुळं कित्येक जणांचं दिवसभराच काम मोबाईलवर असतं अन त्यामुळे घरात मोबाईल घेऊन बसावं लागतं. यात कित्येक जणांच्या घरी अगदी ठराविक ठिकाणीच मोबाईल सिमकार्डला चांगलं नेटवर्क मिळतं.

आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा नेटवर्क नसण्याचा अनुभव आला असेल, की घरात एखाद्या रुममध्ये, किंवा एखाद्या खिडकीत चांगली रेंज मिळते. पण दुसरीकडे आजिबातच नेटवर्क दिसत नाही. अशा वेळी केवळ कॉल करण्यासाठी देखील उठून दुसरीकडं कधीकधी जावं लागतं. तुमच्याही घरात ऑफिस मध्ये अशीच समस्या असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

6 Tricks मोबाइल नेटवर्क कैसे ठीक करें Mobile Network Solution in Hindi

तुमच्या फोनची सेटिंग तपासा

कित्येक वेळा फोनमध्ये सगळीकडे नेटवर्क न येण्याचं कारण नेटवर्क सेटिंग सुद्धा असू शकते. तुमच्या फोनमध्ये 2G किंवा 3G नेटवर्क सुरू असेल तर सगळीकडे नेटवर्क मिळेलच असे नाही. यामुळे तुमच्या स्मार्टफोनची नेटवर्क सेटिंग 4G अथवा 5G करुन घ्या.

काचेचा ग्लास

ऐकायला विचित्र वाटेल. मात्र, कित्येक तज्ज्ञांनी याचा सल्ला दिला की, तुमच्या फोनला घरामध्ये जर आजिबातच नेटवर्क नसेल, तर तुमचा फोन एका काचेच्या ग्लासमध्ये ठेवा. यानंतर तुम्हाला काही प्रमाणात नेटवर्क नक्की मिळेल.

सिग्नल बूस्टर

या साध्या उपायांनी काही मदत होत नसेल, तर तुम्हाला थोडा खर्च तर करावाच लागेल. बाजारात नेटवर्क बूस्टर (Network Booster) नावाचं डिव्हाईस मिळतं. यालाच सिग्नल (Signal) बूस्टरही मिळतात. याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फूल नेटवर्क मिळू शकतं. यासाठी तुम्हाला सुमारे हजार रुपये खर्च करावा लागेल.

तुमची सिम कंपनी बदला

तुमच्या घरी नेटवर्क न येण्याचं कारण तुमच्याकडे असलेल्या सिम कंपनीचा टॉवर तुमच्या घराजवळ / क्षेत्राजवळ नसेल. यामुळे तुमच्या घरामध्ये कोणत्या सिमकार्डला चांगली पर्यायी रेंज मिळते हे चेक करून त्याकंपनीकडे तुमचा नंबर पोर्ट करून घेऊ शकता.

Related post

error: Content is protected !!