Cancel Preloader

Amazon – आपला हात जगन्नाथ! UPI पेमेंट करा झटपट, ॲमेझॉनने विकसित केले गजब तंत्रज्ञान

 Amazon – आपला हात जगन्नाथ! UPI पेमेंट करा झटपट, ॲमेझॉनने विकसित केले गजब तंत्रज्ञान

Amazon One Service : डिजिटल पेमेंट क्षेत्रात दिवसांदिवस क्रांती सुरुच आहे मात्र याच डिजिटल पेमेंटमध्ये या काही वर्षात झपाट्याने AI तंत्रज्ञान बदलत आहे. त्यात ॲमेझॉनच्या वन सर्व्हिसने पुन्हा एक अनोखी डिजिटल झेप घेतली आहे. तुम्हाला एकदम झटपट पेमेंट करताच येणार आहे ते पण कोणत्याही कार्ड आणि मोबाईल ॲपशिवाय.

तंत्रज्ञान प्रत्येक दिवशी कात टाकते असे म्हणतात. प्रत्येक दिवशी त्यात देखील मोठा बदल होतांना दिसतोय.  डिजिटल पेमेंटच्या युगात पण अनेक नवनवीन बदल होत आहे. सुरुवातीला रोखीत व्यवहाराचे युग होते. त्यानंतर डेबिट / क्रेडिट कार्ड माध्यम, पण कार्ड प्रत्येक ठिकाणी स्वीकारले जात नव्हते. त्यानंतर किरकोळ व्यवहारात खरी क्रांती आणली ती म्हणजे UPI डिजिटल पेमेंटने. या क्रांतीने संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेला युनिक बुस्टिंग मिळाले. खरतर भारतीय UPI डिजिटल पेमेंटचा डंका तर आता युरोपपासून तर पूर्वोत्तर देशापर्यंत देखील वाजला आहे. पण डिजिटल पेमेंट पुरतेच AI तंत्रज्ञान आता मर्यादीत राहिले नाही. त्यात ॲमेझॉन वन सर्व्हिसने ( One Service ) पुन्हा एक डिजिटल झेप घेत आपली मुसंडी मारली आहे. तुम्हाला एकदम झटपट पेमेंट करता येईल, ते ही कोणत्या कार्ड आणि मोबाईल ॲपशिवाय..

आजचे UPI डिजिटल पेमेंट

UPI डिजिटल पेमेंटसाठी तुमच्याकडे स्मार्टफोन असणे गरजेचेच मात्र सध्याच्या काळात या डिजिटल पेमेंटचा सर्रास वापर सुरु आहे त्यात गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम आणि इतर अनेक UPI पेमेंट ॲपचा बोलबाला आहे. हे सर्व UPI चा वापर करतात. पण ॲमेझॉनच्या वन सर्व्हिस ने डिजिटल पेमेंट मध्ये एक पाऊल आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने टाकले आहे.

Amazon One Lets Consumers Pay With Their Hand

काय आहे हे नवीन तंत्रज्ञान

आता या नवीन डिजिटल पेमेंटसाठी कार्ड, मोबाईल ॲपची गरज नाही. ॲमेझॉनने यात जबरदस्त AI तंत्रज्ञान आणले आहे. त्यात कोणत्याही क्रेडिट, डेबिट कार्डची ग्राहकाला जवळ गरज भासत नाही. त्याला मोबाईलमधील युपीआय व ॲपची सुद्धा गरज भासत नाही. मग कशाच्या आधारावर डिजिटल पेमेंट करता येईल ? आता ते आपला हात जगन्नाथ द्वारे

हे सोप्पं तंत्रज्ञान तुमच्या हाताच्या आधारे काम करते. केवळ हाताच्या आधारे तुम्हाला समोर पेमेंट करता येणार आहे पण खरी सुरवात Whole Foods स्टोअर पासून सुरु झाली मात्र हे तंत्रज्ञान Amazon Prime च्या काही सदस्यांना यापूर्वीच अँक्टिव्ह करून देण्यात आली आहे. ॲमेझॉन वन सर्व्हिस लवकरच इतर भारतीय स्टोअर्सवर देखील सुरु होईल. प्राईम मेंबरला या सेवेसाठी खास सवलत, विशेष सूट पण देण्यात येणार आहे.

Amazon One lets you pay with your palm - The Verge

येथे करावी लागेल नोंद

या सेवेचा लाभ घेण्यासाठी सदस्याला Amazon One Kiosk वर नोंदणी करावी लागेल. रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला डेबिट कार्डला टर्मिनलमध्ये ठेवावे लागेल. रिडरवर तुम्हाला तुमचा हात ठेवावा लागेल. त्यानंतर मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. अशा प्रकारे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. नोंदणी पूर्ण झाल्यावर ॲमेझॉन वन सर्व्हिसचा वापर करता येईल.

हातच का बरं

तुमच्या मनात प्रश्न असेल की, या सेवेसाठी ॲमेझॉनने हाताचीच निवड का केली असेल? आपल्या फिंगरप्रिंटसारखाच आपला हात पण युनिक असतो. तो जगात एकमेव असतो. बोटांच्या ठशासारखाच प्रत्येक व्यक्तीचा हाताचा पंजा पण वेगवेगळा असतो. हाताचे क्लोनिंग पण लवकर करता येत नाही.

सुरक्षेचे काय

ग्राहकाची गोपनियता आणि सुरक्षेसाठी ॲमेझॉन वन सर्व्हिसमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. ग्राहकाचा हा डेटा कोणत्याही तिसऱ्या कंपनीला, सेवा पुरवठादाराला शेअर करण्यात येत नाही. एखाद्या सरकारच्या आदेशानंतर डेटा शेअर करण्यात येतो. युझर्सचा बायोमॅट्रिक डेटा हा AWS Cloud मध्येच जतन करण्यात येतो. त्यामुळे तो सुरक्षित राहतो.

Related post

error: Content is protected !!